कंटाळलेत देवही...

Posted By सदगुरू पाटील | 19 February 2016 11:50 IST

रात्री भेटले
देव मला
घामाघूम झालेले
मंदिरे  सोडून
एकत्र  आलेले

महाजनांचे  वाद
निधीवरून तंटे
देवळातील चोर्‍या
देवस्थान  जमिनींबाबत खटले
भक्तजनांमधील हेवेदावे
सगळ्यालाच कंटाळलेत देव

आता  देवांनीच ठरवलेय
संघटित  होऊन
सर्वांसाठी  एकच  देऊळ
बांधायचे.
सर्व  देवांनी
मूर्तीच्या  रूपात
एकाच  देवळात  बसायचे
अन् अध्यात्मिक  शांतता म्हणजे
नेमके काय ते  अनुभवायचे

निवडणुकाही  नकोत अन्
महाजनही नकोत
माणसांना तर  देवळात
प्रवेशच  नको

देवांनी, देवांसाठी बांधलेले
फक्त  देवांचे देऊळ

देऊळ  बांधकामासाठी
देवांनी  प्रसाद  लावला
प्रसाद  होऊ नये म्हणून  माणसांनी
आटापिटा केला

पण देऊळ  साकारले
देवांचा हा लोकशाही निर्धार
मला फार आवडला

आता माझ्या गावचे श्रेष्ठ 
अन्  कनिष्ठ,
जातपात विसरून
संघटित झालेत
देवांमध्ये फूट कधी पडेल
याची  वाट पाहत आहेत
देवांमध्ये  भांडण लावण्यास
निमित्त शोधत आहेत

Drop a comment

Error in sending the comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Good one. I remembered Mangesh Padgavkar's poem on God, about God running from the temples after they were fed up with their Bhakta Jan.

- Arvind, Goa | 21 st February 2016 05:51

 

Related Blogs