सरकारच्या ड्रामाबाजीचा भावे हा बळी

By Sandesh Prabhudesai
28 September 2012 10:55 IST

एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा तिने असे करायला नको होते आणि तसे करायला हवे होते अशी मुक्ताफळे उधळणे फार सोपे असते. खरं म्हणजे ही मुक्ताफळे फार निर्घृण प्रकारची असतात वा स्वतःच्या निर्दय कृतीचे ते किळसवाणे समर्थन असते. खाण खात्यातील भूगर्भशास्त्र अधिकारी दत्तात्रय भावेनी आत्महत्या केली तेव्हा “त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे होते” ही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची मुक्ताफळे हा अशातलाच प्रकार होता. जेवढा निर्दय तेवढाच असंवेदनशील आणि आपल्या अधिकाऱ्यांच्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालण्याचा किळसवाणा प्रकार. भ्रष्टाचार करणारी माणसे निर्लज्ज असतात असे म्हणतात. अशा माणसांनी आत्महत्या केल्याचे कधी ऐकिवात नाही. त्यात भावे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते आणि खाण खात्यातीतल गैरप्रकारांमुळे अस्वस्थ बनून स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या मनस्थितीत होते असे त्यांचे आप्तेष्ट व मित्रमंडळी सांगतात. हे जर खरे असेल तर अशा निरपराधी सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करून सरकारने काय साधले हा प्रश्र्न लाखमोलाचा ठरतो. मग तो केवळ आत्महत्येपुरता मर्यादित रहात नाही. सरकारच्या अमानवी वृत्तीचा तो दखलपात्र नमुना ठरतो. ज्या कोणा वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे वा सत्ताधारी राजकारण्यांमुळे भावेसारख्या कर्तव्यदक्ष व संवेदनशील अधिकाऱ्यांनी स्वतःचे आयुष्य संपविण्याचा कठोर निर्णय घेतला त्यांचे सरकारी आयुष्य संपविणे क्रमप्राप्त ठरते. यामागील कटू सत्य शोधून काढणे अत्यंत महत्वाचे ठरते.

परंतु बेकायदेशीर मायनिंगवरील शहा कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून ज्याप्रकारे पर्रीकर सरकारने पावले उचललेली आहेत ते पहाता त्यात ड्रामाबाजीच जास्त दिसते. लोकांच्या डोळ्यांना पाणी पुसण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे नाटक करणे व प्रत्यक्षात मात्र मायनिंग लॉबीचेच लांगूलचालन करणे हाच प्रकार यातून जास्त प्रवर्तित होतो. 35,000 कोटी रुपयांची महाचोरी (की महादरोडा) पकडली तर स्वतःला भ्रष्टाचारविरोधी म्हणविणाऱ्या सरकारने काय केले? चोरांना मोकळे सोडले. उलट त्यांनी चोरलेला माल विकण्यास त्यांना अधिकृत परवानगी दिली. तेही कागदपत्रांची छाननी करून कोणत्या खाणी कायदेशीर व कोणते खनिज कायदेशीर ते ठरवण्यापूर्वीच. मात्र आपण कर्तव्यकठोर आहोत असे दाखविण्यासाठी खनिज उत्खननाचे काम प्रलंबित केले. (प्रत्यक्षात पावसाळ्यामुळे ते बंदच होते.) त्याचबरोबर सहा अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित केले. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित केले गेले तर त्याला तीन पर्याय दिले जातात – त्याच्या कार्यालयात त्याने हजेरी लावणे, हेडक्वार्टर्समध्ये हजेरी लावणे वा घरी बसवणे. या सहा अधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र उलट ज्या मडगाव शहरात खाण खात्याचे कार्यालयच नाही तेथे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजेरी लावण्याची त्यांच्यावर सक्ती केली गेली. तेही त्यांच्यावर कसलेही चार्जशीट लावल्याशिवाय.

निलंबन म्हणजे आरोपही नव्हे वा शिक्षाही नव्हे हे मुख्यमंत्र्यांचे विधान तंतोतंत खरे आहे. निलंबित कर्मचारी त्याच्यावरील आरोप सिद्ध होईपर्यंत अपराधी ठरू शकत नाही व अपराध्याची वागणूकही त्याला दिली जावू शकत नाही. तरीसुद्धा नियमभंग करून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एन् डी अगरवाल येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसावेत अशा पद्धतीने खुर्च्या टाकून या निलंबित अधिकाऱ्यांना दिवसभर बसवून ठेवतात. येणारे-जाणारे छद्मीपणाने त्यांच्याकडे बघत – हे बघा खाणचोर – असे म्हणत जातात. या मानहानीचा आणि मानसिक छळाचा परिणाम म्हणून भावेसारखा एक संवेदनशील अधिकारी आत्महत्या करतो. संपूर्ण गोवा हादरतो. तर त्यावर सरकारची प्रतिक्रिया काय? मुख्यमंत्री म्हणतात, ते अपराधी नव्हते तेव्हा त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे होते. आणि त्यांना कंट्रोल रूममध्ये अपराध्यांसारखे बसविणारे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी काय़ म्हणतात? – “मानहानी आणि छळवणूकच करायची होती तर त्यांना मी गॅलरीत बसवले असते. सकाळी येवून सही मारून घरी जाण्याची त्यांना मुभा होती. दिवसभर बसून रहावे की नाही ही त्यांची मर्जी होती.” म्हणजे भावेसहित सहाही अधिकाऱी सक्ती नसतानासुद्धा आपल्या मर्जीने दिवसभर उघड्यावर बसून राहिले व आपणच आपणावर लादलेली मानहानी सहन झाली नसल्यामुळे त्यातील भावे नावाच्या एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली? आणि तरीही या चुकीच्या वागणुकीचा फेरविचार केला जात नाही?

सरकारने निलंबित केलेले सहाही अधिकारी खरोखर दोषी आहेत की काय हे शेवटी चौकशीत ठरेल. परंतु ही ड्रामाबाजी वाटण्याचे आणखी एक कारण आहे. संपूर्ण शहा अहवालात रामनाथ शेटगांवकर या अधिकाऱ्याचे नाव परत परत घेतले गेले आहे. निलंबनाचा आदेश दिला गेला तेव्हा हे अधिकारी दिल्लीला होते म्हणून म्हणे त्यांना निलंबित केले गेले नाही. राज्याबाहेर असल्यामुळे संशयित अधिकाऱ्याला निलंबित केले गेले नसल्याचा हा अजबाच प्रकार आहे. हे अधिकारी दिल्लीहून गोव्यात परतले तरी अजून त्यांचे निलंबन होत नाही. शेटगांवकरचे नाव अहवालात नमूद केलेले असेल तर त्यांना निश्र्चितच निलंबित केले जाईल असे मुख्यमंत्री सांगतात. प्रसारमाध्यमे मग शहा अहवालातील शेटगावकरच्या नावाची पानेच दाखवतात. परंतु आमचे कर्तव्यकठोर मुख्यमंत्री त्यांना अजूनपर्यंत निलंबित करीत नाहीत. एका मंत्र्याचे ते आप्तेष्ट असल्याने त्यांना संरक्षण दिलेले आहे हा आरोपही फेटाळून लावतात. आता हा चोर सोडून संन्याशाला सुळावर देण्याचा प्रकार वाटला तर त्याच चूक काय?

ड्रामाबाजीचा त्याहून मोठा कळस म्हणजे फोंड्याच्या न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चालविलेल्या चौकशीचा. या आत्महत्येच्या प्रकरणात आरोपाचा ठपका येतो तो दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांवर. आणि त्याची चौकशी करतात उपजिल्हाधिकारी. कदाचित उपजिल्हाधिकारी निपक्षपातीपणाने चौकशी करतीलही. परंतु आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्याचे धाडस करतील का? तेही मुख्यमंत्री धरून सगळेच त्यांना संरक्षण देत आहेत तेव्हा? म्हणूनच बेकायदेशीर मायनिंगवर उचललेली सगळी पावलेच संशयास्पद वाटतात. केवळ ड्रामाबाजी वाटते. सरकार खरोखरच हे बेकायदेशीर प्रकार बंद करण्याबाबत गंभीर आहे काय असा प्रश्र्न मनात उपस्थित होतो. खरे म्हणजे भावेनी आपल्या आत्महत्येतून मनोहर पर्रीकरांपुढे एक आव्हानच उभे केलेले आहे. आपण प्रामाणिक आहोत हे सिद्ध करून दाखविण्याचे. बस्स, त्यांनी ते सिद्ध करावे. निदान ड्रामाबाजी तरी करू नये.

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

parrikar orders bhave to go for enquiry. one antonio tells him he has committed a crime by suicide. one jay goa says he should go to press, one palkar congratulates parrikar. you guys are just amazing. you want a dead person to do so many things!!! you dont even let him rest in peace.

There is this one transgender character [email protected] [email protected] vaz. i accused him him of being a member of parrikars public harrasment goons. he wrote a 1 page letter admitting himself to be one. Mr. palkar giving 1000 Rs. to us from our own tax paid does not give you a liscence to kill.

you guys are not humans, you are blood sucking vampires.

- bhushan, panaji | 03 rd October 2012 12:16

 

congrats Manoharbab Parrikar ,congrats !!! You are the first C.M. to provide an allowance of Rs.1,000?- per month directly in the A/C s of 1,50,000 , Goan housewives ,irrespective of caste/creed/religion they belong to...the corrupt congress govt. in n delhi ,enjoying choicest scotch/biryanis in a/c comfort with their 2-G / coalgate big shots ,has increased the burden on the AAM AADMIs` wives who fail to meet the both ends meet...this timely help of the BJP govt,is a GOD SENT gift...the corrupt congress fooled the gullible by AAM AADMI slogan in the last loksabha elections ,but the WISE voters of GOA thru/kicked out the corrupt congress digu govt .and wisely gave the verdict in favour of the BJP and Parrikar ! whatever the BJP manifesto promissed in the elections...Parrikar is delivering...let the frustrated souls/chamchas,shout,abuse...let us ignore them and march forward to see better Goa and India...

- manohar palkar, goa/bangalore | 02 nd October 2012 17:40

 

भावेच्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा मुख्य मंत्री . एका बाजूला भावेचा बळी द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला बेकायदेशीर खाण धंद्यात गुंतलेल्या बड्या धन दांडग्या माफिया बरोबर मेजवानी झोडायची , त्यांच्या कार्यक्रमाना आवर्जून हजेरी लावायची आणि त्यांना आशीर्वाद देवून पवित्र ठरवायचे . वा वा पर्रीकर तुम्ही धन्य आहात .

दुसरा हिदुत्ववादी नरेंद्र मोदी विवेकानंदाना फुटबाल वर छापून त्यांच्यावर लाथा मा रतोय आणि आता पुढे निवडणुका आल्यावर तुम्ही पण एक आदर्श हिंदुत्ववादी नेता शोधा नाहीतर गोव्याची जनता तुमचे ढुंगण शाबूत ठेवणार नाही.

- Gajendra Tari, Ponda Goa | 02 nd October 2012 13:34

 

Dear Manohar Palkar baab, I am not here to defend Sandesh Prabhudesai against your diatribe but you seem to be blinded by your infatuation for Manohar Parrikar and his party, BJP. Naturally you personalize the issue and accuse that the columnist has an inherent bias against BJP. You also accuse that he has never lifted his pen against the corrupt in Congress. The names you mentioned have hardly anything to do with Goa. Goanews as per my understanding is a Goa centric website and I am happy that it has not drifted away like several ' walls' which have prefix Goa but continuously churn out junk which is irrelevant to Goa and Goans, while systematically pushing ahead their own communal propaganda and ideology. Many of these self proclaimed intellectuals(?) are directly or indirectly connected to RSS, the mother of all communal organizations in India which wants to bring Hindu rashtra based on Varna or the caste system in India.

While their sister concern BJP was in the power, their mouths were shut ( obviously as they too were busy gobbling the fruits of power). Now you seem to be blind to the misrule and scams of BJP where you live (Karnataka).

Glorification of RSS and their leaders can no more deceive the masses because the people from lower castes are getting educated and are aware of historical and puranical lies by the brahminical class of this country which forced them into subjugation.

So Palkar baab, do not get frustrated and let out your anger at the writer. Counter him with logic and not through a personal attack

Today, Manohar Parrikar who supported the Shah Commission report and accused some of the biggies involved in illegal mining is sharing dais with them. He is the Chief Guest to commemorate the TV Channel owned by a mine owner accused of illegal mining in Shah report. Whom is he trying to fool?

Goans are smart to read between the lines and sycophancy may not be the best policy. The smoke is already out from the BJP camp and "yatra yatra dhumna, tatra tatra agni".

- Rajan Kamat, Feira Alto, Mapusa | 02 nd October 2012 12:14

 

Dear Mr.Prabhudesai,you have not got over the shock of BJP`s tremendous success in the last elections..nor you can digest BJP govt in goa..you have never never criticised the last corrupt congress govt or the corrupt central govt or the likes of kalmadi,raja or others.your love for the congress is legendary..hence anything ,even a little excuse is enough for you or your `selected `few `writers ` who are v v biased ,to pounce on the BJP or Parrikar..so your or your so called writers` comments hold no water and they are all biased as usual ...not at all surprising ..go ahead ..nobody takes you all seriously..and because of this very reason ,your newsletter is not neutral...hence it is not growing..pl refer to your TRP...and introspect..but its v late now to rectify.!

- manohar palkar, goa/bangalore | 01 st October 2012 14:21

 

If Bhave was innocent, why did he commit suicide. You must remember that committing suicide is also a crime!

- Antonio, Goa | 30 th September 2012 22:01

 

If Bhave was indeed harassed as you are alluding to, then he should have approached the proper agency or even press. And Bhave's name is there in Shah commission together with

Shetgavkar, so what is your logic in judging Shetgavkar as culprit and Bhave as innocent! Don't try to sit in the 'JUDGE'S' Position, Mr. Prabhudessai.

Besides you claim Shetgavkar is related to a minsiters, can you spell out that relationship and with which minister?

- Jay Goa, GOA | 29 th September 2012 03:26

 

Related Blogs