लिंगपिसाट संस्कृती

By Sandesh Prabhudesai
11 October 2015 12:57 IST

खरोखरच एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यापासून गेल्या दहा-पंधरा वर्षांत लैंगिक चाळे, विनयभंग व बलात्कारांचे प्रमाण वाढत चालले आहे? की स्त्रीच्या स्वाभिमानाची जाणीव वाढत चालल्याने धीटपणे स्त्रिया तक्रारी घेऊन पुढे यायला लागल्या आहेत? काहीही असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे. लैंगिक अत्याचाराची व्याख्या विस्तारत चालली आहे आणि त्यामुळेच खास करून पुरुषांची स्त्रियांकडे बघण्याची लिंगपिसाट नजर आता कायद्याच्या कचाट्यात सापडून तुरुंगवासी होत चालली आहे. खास करून दिल्लीच्या ‘निर्भया’ प्रकरणानंतर तर जास्तच. 2013 साली दिल्लीत सामुहिक बलात्काराचा जो प्रकार झाला तो भयानकच होता. ‘आम्हाला काय त्याचे’ असे अन्यथा म्हणणारा सुशिक्षित मध्यमवर्गीय त्यावेळी मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरला, प्रसार माध्यमांनी या अभूतपूर्व निषेधाचे जाहीर चर्चेत रुपांतर केले आणि भारतीय संसदेला दखल घेऊन कायद्यातील लैंगिक अत्याचाराची व्याख्या विस्तारावी लागली. त्यामुळे येता जाता स्त्रियांच्या स्त्रीत्वाचा अवमान करणारी भाषा वापरणाऱ्या पुरुष वर्गाला जरब बसली व स्त्री वर्ग तक्रार करायला पुढे यायला लागला. अर्थात, या कायद्याचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार घडत आहेत, परंतु तुरळक. त्यात भर म्हणून प्रत्येक कार्यालयात लैंगिक अत्याचाराचा समाचार घेणारी अंतर्गत समिती नेमण्याचा कायदा आल्यापासून स्त्री वर्गाचा आत्मविश्र्वास आणखीनही वाढलेला आहे हे निःसंशय. म्हणूनच असेल कदाचित, हल्लीच्या काळात पोलीस स्थानकावरील तक्रारीतही कमालीची वाढ झालेली आहे.

अत्याचार आणि शोषण याचा इतिहास अनंतकालीन आहे. त्यात आपल्या वरिष्ठपणाचा गैरवापर करून कनिष्ठ वर्गाला गुलाम बनवण्याची मदांध वृत्ती दडेलेली आहे. मग तो वरिष्ठपणा सत्तेचा असो, धनसंपत्तीचा असो, मालकवर्गाचा असो, जातीचा असो, धर्माचा असो वा पौरुषत्वाचा. याचा फायदा घेऊन कनिष्ठावर अत्याचार करायचे व आपल्या स्वार्थासाठी त्याचे शोषण करायचे ही समाजाची परंपराच बनली. आपण शोषणासाठीच जन्माला आलो आहोत अशी कनिष्ठ वर्गाचीही पराभूत भावना बनली. कुढत मरत जगायचे, स्वतःला हवे तसे वापरायला द्यायचे आणि ते सहन झाले नाही तर एक दिवस आपणच आपले आयुष्य संपवून टाकायचे हा मानवजातीचा इतिहास बनला. त्यातूनच गुलामगिरीविरुद्ध उठाव करणाऱ्या स्पार्टाकसपासून दलितांवरील अत्याचाराविरुद्ध क्रांतीशिंग फुंकणाऱ्या फुले-आंबेडकारांपर्यंत कित्येक देशात कित्येक क्रांतीकारी उभे राहिले व त्यांनी शोषण आणि अत्याचारांचा हा इतिहासाच बदलून टाकला. गोव्यात तर एका संपूर्ण समाजाला भोगवस्तू समजण्याची संस्कृती विसाव्या शतकात परंपेरेचे बिरूद लटकावून अभिमानाने मिरवत होती. राजाराम पैंगीणकर व त्यांच्या अनुयायांनी या भोगवादी परंपरेविरुद्ध रणशिंग फुंकले व बंडाबरोबरच जनजागृती, शिक्षण व संघटनात्मक कार्यातून ही परंपरा कायमची संपवून टाकली. संपूर्ण भारत देशात एवढी मोठी सामाजिक क्रांती आणखीन दुसरी कुठली झालेली नसेल.

पण म्हणून स्त्रीकडे भोगवादी वस्तू म्हणून पाहण्याची वृत्ती काही समाजातून पूर्णतया नामशेष झाली नाही. लैंगिक अत्याचाराचा नायनाट करण्याचा कायदा आणून व भारतीय दंड संहितेच्या कलमात नव्या उपकलमांचा समावेश करूनसुद्धा कनिष्ठ वर्गाचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार आजही सर्रास चालूच आहेत. ज्या प्रसार माध्यमांनी ‘निर्भया’ प्रकरणानंतर या कायद्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी जनजागृतीचे अभियान सुरू केले त्याच प्रसारमाध्यमातील सुशिक्षित व विद्वान लोकांनीसुद्धा आपली लिंगपासाटी कृत्ये चालूच ठेवली. गेल्या वर्षी गोव्यात चव्हाट्यावर आलेले तरुण तेजपाल प्रकरण संपूर्ण भारतभर गाजले. एका राजकीय व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविणारा निर्भय पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त केलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील पत्रकाराने आम्हा सर्वच पत्रकारांना मान खाली घालायला लावली. आणि एक लिंगपिसाट वृत्ती एका पत्रकाराची करियर कशी संपवू शकते तेही या प्रकरणाने सिद्ध करून दाखवले.

आणि त्यानंतर वर्षभरात गोव्यात आता गाजते आहे ते दुसरे प्रकरण म्हणजे रुपेश सामंतच्या लैंगिक अत्याचारांचे प्रकरण. आतापर्यंत या पत्रकारावर केवळ पाच मुलींनी पुढे येऊन चार तक्रारी दाखल केलेल्या आहेत. परंतु या तक्रारींची संख्या कितीही वाढू शकते एवढे त्याचे एकाहून एक भयंकर स्वरुपाचे कारनामे आहेत असे सर्वचजण उघडपणे बोलू लागले आहेत. सध्यापर्यंत मोबाईलवरून मॅसेज पाठवणे, लैंगिक स्वरुपाची भाषा वापरणे, लैंगिक स्वरुपाच्या शारिरिक हालचाली करणे व विनयभंग करणे अशा तक्रारी आलेल्या आहेत. पण त्याने केलेल्या लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या काही मुली डिप्रेशनमध्ये गेलेल्या आहेत तर काहींचे संसार उध्वस्त झालेले आहेत असेही आता याचा छडा लावणारे काही आदरणीय वरिष्ठ पत्रकार जाहीरपणे व छातीठोकपणे सांगू लागलेले आहेत. काहींच्या मते तर महानंद नायकाच्या खूनसत्राच्या साखळीपेक्षाही मोठी साखळी या लैंगिक अत्याचारांची आहे. ज्या निर्भयपणे रुपेश सामंतच्या हाताखाली काम करणाऱ्या पाच मुली पुढे आलेल्या आहेत त्याच निर्भयपणे कदाचित आणखीनही मुली पुढे येतील. या तक्रारी व्यावसायिक दुष्मनीतून तयार झालेल्या आहेत अशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्याचा एकेकाळचा वर्गमित्र असलेल्या व सामंतच्या कुटुंबियांसमवेत असलेल्या एका पत्रकाराने गुजचे धरणे झाले त्यादिवशी येऊन या तक्रारी पूर्णतया खऱ्या आहेत अशी ग्वाही देऊन सामंतच्या लिंगपिसाट कृत्यांना आपण पाठिंबा देणार नाही असे जाहीररित्या सांगितल्यापासून व्यावसायिक दुष्मनीच्या प्रचारातीलही हवा निघून गेलेली आहे. अर्थात, यातील सत्यासत्यता शोधून काढण्याचे फार मोठे आव्हान आता गोवा पोलिसांसमोर आहे. त्यासाठीच एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला नेमून या लिंगपिसाट प्रकरणाची पाळेमुळे खणून बाहेर काढावीत अशी मागणी खुद्द गोवा युनियन ऑफ जर्नलिस्टने केलेली आहे.

हे प्रकरण आज ना उद्या संपेल. प्रश्र्न या एका प्रकरणाचा नाही. पण अशी प्रकरणे घडतात तेव्हा आपण कोणती भुमिका घेतो याचा आहे. विनयभंग वा बलात्काराचे एखादे प्रकरण घडते त्यावेळी या प्रकरणात दोन आरोपी असतात. एक – जो लैंगिक अत्याचार करतो तो. व दुसरी - या लैंगिक अत्याचारांना बळी पडलेली निरपराध स्त्री. आधी या स्त्रीवर तो लिंगपिसाट अत्याचार करतो. आणि नंतर प्रकरण फुटले की आम्ही-तुम्ही सगळे. हा संपूर्ण समाज. आपण तिला सहानभूती दाखवत नाही. तिला मानसिक बळ देऊन परत उभे रहायला मदत करत नाही. उलट तिचे मानसिक खच्चीकरण करण्याचा जणू विडाच उचलल्यासारखे वागतो. कायद्याने अशा बळी पडलेल्या मुलींची नावे उघड करायला बंदी आहे ती समाजाच्या याच वृत्तीमुळे. या लिंगपिसाटांच्या अत्याचारांना बळी पडलेली ती स्त्री कोण हे जाणून घेण्यासाठी आपण जी धडपड करतो ती बघितल्यावर वाटते – आपण कृतज्ञ माणूस आहोत की कृतघ्न जनावरे? ती स्त्री कोण हे जाणून घेऊन आपणाला काय करायचे आहे? परंतु त्या निर्भय आणि धाडशी स्त्रियांच्या नावांचे अंदाज काढणारे स्वतःला शूरवीर समजतात. एखादी लढाई जिंकल्याच्या आविर्भावात तिच्या नावाची चर्चा करतात. जमल्यास तिची बदनामीही करतात. प्रत्यक्षात या लिंगपिसाट्यांच्या कारवायांना दाद न देणाऱ्या स्त्रियाच या तक्रारी करायला जास्त पुढे येतात. तरीही त्यांना त्याच्या अत्याचारांना बळी गेलेल्या स्त्रिया ठरवून आपण त्यांना बदनाम करीत सुटतो. आणि म्हणूनच मनात असूनसुद्धा कित्येक स्त्रिया तक्रारी करायला पुढे येत नाहीत.

या लिंगपिसाटांच्या कृत्यांना आळा बसायचा असेल तर त्यासाठी तक्रारी पाहिजेत. तेव्हाच त्यांचा तपास होऊन या विकृत प्रवृत्तींना शिक्षा होईल. ते तक्रारदार पुढे येण्याचे विश्र्वासदर्शक वातावरण तयार करणे हे आपले काम आहे. म्हणजे सुरवात माझ्यापासून व्हायला हवी, दुसऱ्यापासून नव्हे. या लिंगपिसाटांच्या अत्याचारांना बळी पडलेल्या तक्रारदारांना जोपर्यंत आपण समाजाच्या न्यायालयातील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून बदनाम करीत राहू तोपर्यंत बळी पडलेल्यांमध्ये तक्रारदार बनण्याचे धाडस निर्माण होणार नाही. समाजातली ही विकृती हेच या लिंगपिसाटांचे सामर्थ्य आहे. स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांची व्याख्या कायद्याने विस्तारलेली आहे. परंतु आपल्या मदत करण्याच्या कर्तव्याची व्याख्या आपण कधी विस्तारणार? खाजगीमध्ये गॉसिप करण्याची वृती हा पराक्रम नव्हे, ती आपली विकृती आहे. त्यांनाच अप्रत्यक्षरित्या बदनाम करणे हे तर माणुसकीला काळे फासणारे नीच कृत्य आहे. आणि ते नीच आपण स्वतः आहोत. ही विकृती कुणी कायद्याने बदलू शकत नाही. त्यासाठी आपणाला सु-शिक्षित व्हावे लागेल, समंजस व्हावे लागेल, तक्रारदार ही माझीच बहीण वा नातेवाईक आहे ही भावना मनात रुजवावी लागेल. नाहीतर, लक्षात असुद्या, आपणही ठरू त्या निर्भय तक्रारदारांवर अत्याचार करणारे – लिंगपिसाट!

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 11 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

I have problem here, this gentleman called Rupesh Samant has worked with the blogger as well, though this is not the reason I am writing this. Well we all know we live in the era of 24x7 electronic media and this so called journalist boast a lot about their integrity and intelligence in defaming the politicians, many of them also do sting operations on politicians, Govt. officials etc, but they ever do something about their collogue? I am sure these journos so called intelligent and vigilantes of the governance are well aware of the deeds of their won collogue. Many of these journos has time to do show on DHIRYO – Bull fight, but they don’t have time to look inward, do some investigative journalism of these Rupesh’s and like jurnos of this journalism world and take some Suo moto action. Post fecto writing something has no meaning, people will recollect for sure, Rupesh was also doing many shows post “Nirbhaya” incident at that time nobody from Journos fraternity objected for it(for God sake no big Jurnos should say that they were not aware what Rupesh was doing). I saw few days back Journs organization doing some dharna for speedy investigation, who the hell they are to tell police? Police will do there work, if Jurnos are so good than they should at least do some investigative journalism now and tell police the where abouts of Rupesh. Every body will recollect what happen approximately 5 to 6 months back, one of the MLA was absconding and these very set of Journalists where floating the new about the MLA’s location, what happen now? Who stops them now? A saying is there” Every Good thing should start from Home” journalists should start this at home this is a good opportunity.

Columnist no doubt has used his god gifted skills and articulated a fine article/column or blog whatever it may be called, but essence of the matter is the time has come for journalist to look inward’s and not to opine about whole society.

Before parting:- don’t forget they(jurnos) are the part of same society so does Rupesh, its time to look back by columnist and think what he did in his organization to save these girls, make conducive environment to work even if it is late night. Blaming society in my opinion is in a way easy way out.

- Purushottam Sandye, Ponda Goa | 15 th October 2015 08:53

 

The article lost its point in the last paragraph. So should we only respect for her privacy and dignity because she could be our sister or relative. Can we respect every woman for being a person/human and not because she could be a men's sister or mother or wife.

- Prachi , Shiroda | 12 th October 2015 20:49

 

Very well said. This abnormal or contorted mentality is a reflection of our culture and upbringing. Women have always been looked down, abused and made use of in our great culture. Our history and present is a reflection of that. Our education system needs to include some lessons on good morals and values such that at least the very new generation will be dissuaded from having such nasty thoughts and will have much broader and universal outlook. You hit the nail, most people are interested in knowing who those #victims# are rather than providing support to those unfortunate ladies or at least keep quite and go on with your damn life. Watch the BBC documentary on Nirbhaya, no Indian film producer worth his/her salt could even think about making it, so much it is part of our psyche. Somebody from outside had to come and tell us about it.

- Ranjan, Goa | 11 th October 2015 17:37

 

Very true story of today's' men and mind.

Sandeshbab u r icon in the field of journalism

- bhachandra amonkar, panaji | 11 th October 2015 15:49

 

अभ्यास पूर्ण आसा.

- sanjiv verenkar, mangeshi | 11 th October 2015 13:15

 

Related Blogs